Promotion wishes by Anjali Godase

आदरणीय श्रीमान रमेशजी चव्हाण साहेब

🚩 आदर्श अधिकारी 🚩


सत्यनिष्ठा प्रामाणिकता
 यांचे माहेरघर तुम्ही 
आदर्श शिक्षणक्षेत्रातील 
आदर्श अधिकारी तुम्ही II धृ .

जावळीच्या शिक्षणाला 
दाखवून सोनेरी वाट 
 तळागाळातील  विद्यार्थ्यांची
 ज्ञानज्योत बनला तुम्ही ॥१॥


शिक्षकांना वेळोवेळी
करून योग्य मार्गदर्शन 
सर्व शिक्षकांची 
सावली बनलात तुम्ही ॥२॥

 शिक्षण विभागाची धुरा
 पेलून अगदी समर्थपणे
 शिक्षणाच्या प्रत्येक घटकांचे 
उत्तम प्रशासक बनलात तुम्ही ॥ ३॥

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास 
धरून मनी ध्यास
 विद्यार्थी शिक्षणासाठी 
तळमळीने रडलात तुम्ही ॥४॥


आधुनिक शैक्षणिक संकल्पनांची 
रोवून मुहूर्तमेढ 
धडपडणाऱ्या गुरुमाऊलींची 
प्रेरणा बनलात तुम्ही ॥५ ॥

होऊ दे तुमच्या संकल्पांची पूर्ती ..
तुमच्या मधून घेऊन स्फूर्ती
 आदर्शांच्या मार्गावरून येणाऱ्यांचे 
दिपस्तंभ बनलात तुम्ही ॥६॥

 तुमच्या भावी स्वप्नांना
मिळू दे हिमालयाची उंची 
आदर्शांचा सुंदर परिपाठ 
शिक्षण जगती घातलात तुम्ही ॥७॥

✍🏻✍🏻
 सौ .अंजली शशिकांत गोडसे
 उपशिक्षक
 शाळा बिरामणेवाडी
 ता . जावली 
 जि. सातारा

Comments

  1. खूपच समर्पक कविता....
    अंजली....कवितेतून अशीच व्यक्त होत राहा....

    ReplyDelete
    Replies
    1. From...अर्पिता मोरे....वाई

      Delete
    2. 👌💐मस्त शब्दांकन!
      धन्यवाद!💐💐🌹🌹

      Delete
    3. खूप छान मॅडम

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद तुमची प्रेरणा या लिखाणाला

      Delete
  3. Khup chaan lihilay from amol kale

    ReplyDelete
  4. समर्पक शब्दांत... यथोचित वर्णन.
    छान कविता

    ReplyDelete
  5. छान शब्दांकन

    ReplyDelete
  6. काव्यांजली!
    अभिनंदन साहेब!
    शुभकामना!

    ReplyDelete
  7. सुंदर शब्दांकन
    अभिनंदन साहेब

    ReplyDelete
  8. खूप छान शब्दांकन

    ReplyDelete
  9. खूपच छान 💐💐💐

    ReplyDelete
  10. सुंदर काव्यबद्धता

    ReplyDelete
  11. खूप छान शब्दांकन

    ReplyDelete
  12. खूप छान मॅडम 💐💐

    ReplyDelete
  13. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Missing school poem by Anjali godase

Rakshabandhan poem by Anjali Godase