Rakshabandhan poem by Anjali Godase

बंध रेशमाचे

💖💖❤️❤️

आला रक्षाबंधनाचा सण  भाऊराया 
राखी बांधते मी तुम्हा गणराया
सुखी ठेवा माझ्या बंधूराया 
हेच मागणे तुमच्या हो पायाIIधृII


 बंधू आहे माझा सीमेवरती

 भारतमातेचे रक्षण करावया

 रायफल बंदूक घेऊन हाती  

सज्ज सदैव तुम्हा-आम्हा रक्षावया ॥१॥


बंधू आहे माझा चौकाचौकांमधी
तुम्हा सर्वांना शिस्त लावावया

शिट्टी काठी घेऊन हाती
अहोरात्र सणवारी कर्तव्य बजवावया ॥२॥


बंधू आहे माझा रानामधी
साऱ्या जगाचं पोट भरावया  
खुरपं नांगर घेऊन हाती
काळया आईसाठी काया झिजवावया॥३॥


 बंधू आहे माझा दवाखान्यामधी
आजारी पीडितांची सेवा करावया 
औषधे इंजेक्शन घेऊन हाती
 दुर्धर रोग पळवून लावावया॥४॥


 बंधू आहे माझा प्रत्येक भारतीयामधी  
भारतमातेची आण शान राखावया 
राष्ट्रभक्तीचा तिरंगा घेऊन हाती 
प्रत्येक संकटाशी उभा लढावया॥५॥
❤️❤️💖💖

✍🏻 कवयित्री ✍🏻
 सौ . अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के )
 मर्ढे सातारा
 मो .नं .९४०३९६९४८२

Comments

  1. खूप छान लिहायला लागली आहेस great keep it up😍👌👍

    ReplyDelete
  2. एकदम छान ताईसाहेब

    ReplyDelete
  3. Very emotional and Heart touching Words 🌹😊
    All the Best 👍🏼

    ReplyDelete
  4. Very emotional and heart touching Words 😊🌹
    All the Best

    ReplyDelete
  5. Very emotional and heart touching Words 😊🌹
    All the Best

    ReplyDelete
  6. खूपच छान अगदी हृदयस्पर्शी, 👌💐💐

    ReplyDelete
  7. खूपच छान 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खूपच छान

    ReplyDelete
  9. विविध रुपातील भाऊराया अप्रतिम वर्णन 🌷

    ReplyDelete
  10. खूप छान ,सुंदर, सुरेख काव्य
    मला अभिमान वाटतो माझ्या
    प्रतिभासंपन्न बहिणीचा

    ReplyDelete
  11. खूपच छान कविता..
    मनापासून आवडली.
    राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  12. Khup chan kavita Anju...
    Keep it up!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Missing school poem by Anjali godase

Promotion wishes by Anjali Godase