Missing school poem by Anjali godase

*दुरावलेली शाळा* 🏫

 *कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली* 
 *आणि माझी शाळा की हो बंद पडली ....* 

वर्षभर केला होता अभ्यास
परीक्षा देऊन व्हायचे होते पास
मोठ्या वर्गाचा म्हणी होता ध्यास 
धरायची होती अभ्यासाची कास 
 *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....* 
 
शाळा मला बुडवायची नव्हती 
बागकामाची तर भारी हौस होती 
बाईंची भिती तर मुळीच नव्हती
शाळा मला माझी आवडती होती 
 *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....* 

नवीन नवीन शिकायचं होतं बरंच काही वाचायचं होतं बाईंच खूप ऐकायचं होतं मनातलं थोडं लिहायचं होतं *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली* ....

गणिताची गंमत होती शिकायची
मराठीतील व्याकरणाची तयारी करायची 
इंग्रजीची भीती होती घालवायची 
जिद्द होती नाव मोठं करण्याची 
 *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....* 

मित्र-मैत्रिणींसोबत मजेत दिवस घालवायचे
दुपारचा शाळेतला भरपेट भात खायचे 
बाईंसाठी रोजच गुलाबाचे फुल आणायचे
कधी कधी हसायचे तर कधी रुसायचे 
 *पण कोणास  ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....* 

सर्वजण एकत्र खेळायचो मजेचे खेळ 
बाईबरोबर आवडीने कधी कधी खायचे भेळ
घरात एकटीलाच जाईन आता वेळ 
शाळेच्या मुलांशी कधी बसायचा मेळ
 *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....* 

दुरावलेली शाळा ऑनलाईन मला भेटली
फोन व्हाट्सअप वर अभ्यास घेऊ लागली
विषय मित्र अभ्यास मित्र संगत नवी भेटली
घरीच बसून शिकायची भारी मौज वाटली
 *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली....* 

आठवण आली की रोज जाते शाळेकडे
बाईंचा आवाज ऐकण्यासाठी रोज बघते वाटेकडे
शाळेशिवाय बाई शिवाय गिरवायचे आता धडे 
करून स्वतःचे रक्षण उघडतील शाळेची कवाडे 

 *पण कोणास ठाऊक* 
 *कोणाची दृष्ट लागली* ....
 *आणि माझी शाळा की हो बंद पडली ....*

         ✍🏻✍🏻
 *सौ . अंजली शशिकांत गोडसे* 
 *शाळा, बिरामणेवाडी* 
 *ता .जावली जि.सातारा*

Comments

  1. छानच! सर्व मुलांची हीच अवस्था आहे

    ReplyDelete
  2. वास्तव मांडलंय👍✍️

    ReplyDelete
  3. छान कविता.मुलांचे भावविश्व अचूक मांडले आहे

    ReplyDelete
  4. खूपच छान कविता...शाळा बंद पण शिक्षण सुरु...हे तर आहेच पण शिक्षकांची शाळेविषयीची ओढ आपण यातून व्यक्त केलीत.छानच..!!

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर ! कविता Keep it up.

    ReplyDelete
  6. हृदयस्पर्शी काव्यरचना

    ReplyDelete
  7. खरंच..! खूप सुंदर कविता, शाळेची आठवण झाली.खूपच हृदयस्पर्शी कविता.... ! !!

    ReplyDelete
  8. खूपच वास्तववादी कविता आपण अपेक्षा करूयात शाळा लवकर सुरू होऊ देत

    ReplyDelete
  9. हदयस्पशी कवीता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Rakshabandhan poem by Anjali Godase

Promotion wishes by Anjali Godase