Posts

Promotion wishes by Anjali Godase

Image
आदरणीय श्रीमान रमेशजी चव्हाण साहेब 🚩 आदर्श अधिकारी 🚩 सत्यनिष्ठा प्रामाणिकता  यांचे माहेरघर तुम्ही  आदर्श शिक्षणक्षेत्रातील  आदर्श अधिकारी तुम्ही II धृ . जावळीच्या शिक्षणाला  दाखवून सोनेरी वाट   तळागाळातील  विद्यार्थ्यांची  ज्ञानज्योत बनला तुम्ही ॥१॥ शिक्षकांना वेळोवेळी करून योग्य मार्गदर्शन  सर्व शिक्षकांची  सावली बनलात तुम्ही ॥२॥  शिक्षण विभागाची धुरा  पेलून अगदी समर्थपणे  शिक्षणाच्या प्रत्येक घटकांचे  उत्तम प्रशासक बनलात तुम्ही ॥ ३॥ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  धरून मनी ध्यास  विद्यार्थी शिक्षणासाठी  तळमळीने रडलात तुम्ही ॥४॥ आधुनिक शैक्षणिक संकल्पनांची  रोवून मुहूर्तमेढ  धडपडणाऱ्या गुरुमाऊलींची  प्रेरणा बनलात तुम्ही ॥५ ॥ होऊ दे तुमच्या संकल्पांची पूर्ती .. तुमच्या मधून घेऊन स्फूर्ती  आदर्शांच्या मार्गावरून येणाऱ्यांचे  दिपस्तंभ बनलात तुम्ही ॥६॥  तुमच्या भावी स्वप्नांना मिळू दे हिमालयाची उंची  आदर्शांचा सुंदर परिपाठ  शिक्षण जगती घातलात तुम्ही ॥७॥ ✍🏻✍🏻 ...

Rakshabandhan poem by Anjali Godase

Image
बंध रेशमाचे 💖💖❤️❤️ आला रक्षाबंधनाचा सण  भाऊराया  राखी बांधते मी तुम्हा गणराया सुखी ठेवा माझ्या बंधूराया  हेच मागणे तुमच्या हो पायाIIधृII  बंधू आहे माझा सीमेवरती  भारतमातेचे रक्षण करावया  रायफल बंदूक घेऊन हाती   सज्ज सदैव तुम्हा-आम्हा रक्षावया ॥१॥ बंधू आहे माझा चौकाचौकांमधी तुम्हा सर्वांना शिस्त लावावया शिट्टी काठी घेऊन हाती अहोरात्र सणवारी कर्तव्य बजवावया ॥२॥ बंधू आहे माझा रानामधी साऱ्या जगाचं पोट भरावया   खुरपं नांगर घेऊन हाती काळया आईसाठी काया झिजवावया॥३॥  बंधू आहे माझा दवाखान्यामधी आजारी पीडितांची सेवा करावया  औषधे इंजेक्शन घेऊन हाती  दुर्धर रोग पळवून लावावया॥४॥  बंधू आहे माझा प्रत्येक भारतीयामधी   भारतमातेची आण शान राखावया  राष्ट्रभक्तीचा तिरंगा घेऊन हाती  प्रत्येक संकटाशी उभा लढावया॥५॥ ❤️❤️💖💖 ✍🏻 कवयित्री ✍🏻  सौ . अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के )  मर्ढे सातारा  मो .नं .९४०३९६९४८२

Shrimant Vendantikaraje Bhosale Vahinisaheb word exellancy by Anjali Godase

Image
🙏🙏 *कर्तव्य 'माऊली'..!* आदरणीय वहिनीसाहेब  श्रीमंत छत्रपती सौ . वेदांतिकाराजे भोसले 🚩🚩 शब्दमहती  *व* वचनाला जागणारी अशी स्वाभिमानी आणि अभिमानी  *हि*  हिरीरीने प्रत्येक कार्य तडीस नेणारी विश्वरूपी कल्याण रूपी अवनी  *नि*  निष्ठापूर्वक कर्तव्य करून चांगल्यासाठी झटत राहणारी कर्तव्यदायिनी  *सा*   सातत्य राखत समाजसेवेचे समाजमन ओळखणारी समाजकारणी  *हे*   हेवेदावे मनी न ठेवता अवघ्या कुटूंबाचा गाडा वाहणारी खळाळती इंद्रायणी  *ब*   बरकत येण्या राज्याला खांदयाला खांदा देऊन बाबा राजेंच्या सदैव साथ देणारी शुरवीर सहचारिणी *श्री*    श्री तशी सौ आणि राजा तशी राणी शिवेंद्रसिंहराजेंची शोभते अर्धांगिणी  *मं*  मंत्र जपत लोक  कल्याणाचे मंदिरातील पवित्र तुळशीचेच दुसरे रूप अशी रूपदायिनी   *त*   तप्त तळपती तेज तलवार बनून अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड बनणारी सेनानी  *छ* छत्रछाया आपल्या गोरगरीब लेकरांवर धरणारी छत्रपतींची महाराणी  *त्र* त्र्यंबकेश्वर म्हणजेच रायगडाच्या जगदिश्वराची अखंड कृपादृष्टि असलेल...

Shrimant Chatrapati Shivendrasinhraje Bhosale Babaraje word Excellency written by Anjali Godase

Image
🚩 श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे 🚩                       शब्द महती *श्री* श्रींच राज्य तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे श्रीमंत    *मं* मंथनातून सागराच्या अमृत कलश बाहेर पडावा असे अमृतरूपी भांडार  *त* तप्त तळपती तरबेज तलवार असणारे तरीही इतरांची मने हळुवार जपणारे  *छ* छत्रछाया सर्वांवर ठेवणारे प्रेमळ राजे  *त्र* त्रस्त असणाऱ्याला कामात व्यस्त ठेवून मस्त प्रशासन चालवणारे *प*  परमप्रिय, पराक्रमी, परोपकारी, प्रजाहितदक्षी असणारे  *ती*  तीर्थक्षेत्र त्यांची पाऊले दर्शने सारी चिंता मिटती  *शि* शिवाई देवीची कृपादृष्टी असणारे , शिवअंश रक्तारक्तात भिनलेले   *वें* वेध घेऊन भविष्याचा दूरदृष्टीने कार्य तडीस नेणारे  *द्र* द्रष्टे नेते , द्रवासारखे सतत प्रवाही राहून दिन दुबळ्यांची तहान भागवणारे   *सिं* सिंहासारखा राजा आणि राजासारखे मन  *ह* हर हर महादेव म्हणत प्रत्येक लढाईस सामोरे जाणारे    *रा* राजस्वी राजबिंड अस रूप  *जे* जेतेपद सदैव अबाधित राख...

Missing school poem by Anjali godase

Image
* दुरावलेली शाळा* 🏫  *कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली*   *आणि माझी शाळा की हो बंद पडली ....*  वर्षभर केला होता अभ्यास परीक्षा देऊन व्हायचे होते पास मोठ्या वर्गाचा म्हणी होता ध्यास  धरायची होती अभ्यासाची कास   *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....*    शाळा मला बुडवायची नव्हती  बागकामाची तर भारी हौस होती  बाईंची भिती तर मुळीच नव्हती शाळा मला माझी आवडती होती   *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....*  नवीन नवीन शिकायचं होतं बरंच काही वाचायचं होतं बाईंच खूप ऐकायचं होतं मनातलं थोडं लिहायचं होतं *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली* .... गणिताची गंमत होती शिकायची मराठीतील व्याकरणाची तयारी करायची  इंग्रजीची भीती होती घालवायची  जिद्द होती नाव मोठं करण्याची   *पण कोणास ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....*  मित्र-मैत्रिणींसोबत मजेत दिवस घालवायचे दुपारचा शाळेतला भरपेट भात खायचे  बाईंसाठी रोजच गुलाबाचे फुल आणायचे कधी कधी हसायचे तर कधी रुसायचे   *पण कोणास  ठाऊक कोणाची दृष्ट लागली ....*  सर्वज...