Posts

Showing posts from August, 2020

Promotion wishes by Anjali Godase

Image
आदरणीय श्रीमान रमेशजी चव्हाण साहेब 🚩 आदर्श अधिकारी 🚩 सत्यनिष्ठा प्रामाणिकता  यांचे माहेरघर तुम्ही  आदर्श शिक्षणक्षेत्रातील  आदर्श अधिकारी तुम्ही II धृ . जावळीच्या शिक्षणाला  दाखवून सोनेरी वाट   तळागाळातील  विद्यार्थ्यांची  ज्ञानज्योत बनला तुम्ही ॥१॥ शिक्षकांना वेळोवेळी करून योग्य मार्गदर्शन  सर्व शिक्षकांची  सावली बनलात तुम्ही ॥२॥  शिक्षण विभागाची धुरा  पेलून अगदी समर्थपणे  शिक्षणाच्या प्रत्येक घटकांचे  उत्तम प्रशासक बनलात तुम्ही ॥ ३॥ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास  धरून मनी ध्यास  विद्यार्थी शिक्षणासाठी  तळमळीने रडलात तुम्ही ॥४॥ आधुनिक शैक्षणिक संकल्पनांची  रोवून मुहूर्तमेढ  धडपडणाऱ्या गुरुमाऊलींची  प्रेरणा बनलात तुम्ही ॥५ ॥ होऊ दे तुमच्या संकल्पांची पूर्ती .. तुमच्या मधून घेऊन स्फूर्ती  आदर्शांच्या मार्गावरून येणाऱ्यांचे  दिपस्तंभ बनलात तुम्ही ॥६॥  तुमच्या भावी स्वप्नांना मिळू दे हिमालयाची उंची  आदर्शांचा सुंदर परिपाठ  शिक्षण जगती घातलात तुम्ही ॥७॥ ✍🏻✍🏻 ...

Rakshabandhan poem by Anjali Godase

Image
बंध रेशमाचे 💖💖❤️❤️ आला रक्षाबंधनाचा सण  भाऊराया  राखी बांधते मी तुम्हा गणराया सुखी ठेवा माझ्या बंधूराया  हेच मागणे तुमच्या हो पायाIIधृII  बंधू आहे माझा सीमेवरती  भारतमातेचे रक्षण करावया  रायफल बंदूक घेऊन हाती   सज्ज सदैव तुम्हा-आम्हा रक्षावया ॥१॥ बंधू आहे माझा चौकाचौकांमधी तुम्हा सर्वांना शिस्त लावावया शिट्टी काठी घेऊन हाती अहोरात्र सणवारी कर्तव्य बजवावया ॥२॥ बंधू आहे माझा रानामधी साऱ्या जगाचं पोट भरावया   खुरपं नांगर घेऊन हाती काळया आईसाठी काया झिजवावया॥३॥  बंधू आहे माझा दवाखान्यामधी आजारी पीडितांची सेवा करावया  औषधे इंजेक्शन घेऊन हाती  दुर्धर रोग पळवून लावावया॥४॥  बंधू आहे माझा प्रत्येक भारतीयामधी   भारतमातेची आण शान राखावया  राष्ट्रभक्तीचा तिरंगा घेऊन हाती  प्रत्येक संकटाशी उभा लढावया॥५॥ ❤️❤️💖💖 ✍🏻 कवयित्री ✍🏻  सौ . अंजली शशिकांत गोडसे ( शिर्के )  मर्ढे सातारा  मो .नं .९४०३९६९४८२